रामनाथी येथे श्री रामनाथ सभागृहात एका संस्थेचाकार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला मी पत्रकार म्हणून उपस्थित होतो. कार्यक्रम सुरू होण्यास थोडा उशीर होता. इतक्यात माइयाजवळ एक मुलगा आला व म्हणाला ' तू मुळवी न्ही? ' मी म्हटले होय. तो म्हणाला माझी आई, तुझी आणि तू लिहिलेल्या ' तूं आई आहेस का? ' या नाटकाची खूप स्तुती करत आहे. असे सांगून त्यांनी माझ्याशी संवाद साधला. आपण श्री हर्डीकर गुरुजींकडून मराठी भाषा शिकत आहे. मला लेखनाची आवड आहे. मी त्याला म्हठले लिहित राहा. आणि वाचनाची गोडी लावून घे. माझी काही मदत हवी असल्यास मी द्यायला तयार आहे. ही आमची पहिली ओळख होती. नंतर ते शिकत राहिले. कधी-मधी भेट झाली तर थोडेसे बोलणे. मी माझी शिक्षकाची नोकरी सांभाळून नवप्रभा राष्ट्रमत व तरुण भारतात फोंड्याच्या बातम्या देण्याचे काम करत होतो. पुढे पुढे हा जॉन आगियार माझा मित्र बनला. घरात आई-वडीलाचा एकुलता एक मुलगा त्यांची ' उंडे 'काकणे बनविण्याची तिस्क-फोंडा येथे घरातच भट्टी (खोर्न) होते. वडील ख्रिश्चनं तर आई. हिन्दु सारस्वत-ब्राह्मण समाजातील. वत्स गोत्री. आपल्या आई-वडिलांचे गुण घेऊन जन्माला आलेला हा मुलगा. त्याचे नाव त्यांनी जॉन असे ठेवले. घरातच नाही शेजाऱ्यासाठी तो लाडका बनला: शिकत असतानाच त्यांनी लेखनाला सुरवात केली. चौगुले महाविद्यालयांत-शिकत असतांना कॉलेज जीवनात व शालेय जीवनात विविध स्पर्धात भाग घेऊन पारितोषिके पटकावली. चौगुले महाविद्यालयातून बी.ए. पर्यंत पदवी संपादन केल्यानंतर साळगावकर कायदा महाविद्यालयात कायदेविषयक शिक्षण घेण्यासाठी प्रवेश केला पण अपरिहार्य कारणास्तव हे शिक्षण अर्ध्यावर सोडावेलागले. पिंड लेखकाचा असल्याने वयाच्या १८ व्या वर्षी ओ हेराल्ड या पोर्तुगीज, कोंकणी वर्तमानपत्राच्या कोंकणी विभागात काम केले. हे करत असतानाच फोटो जर्नालीझम चेही प्रशिक्षण घेतले. मडगावहून प्रसिध्द होणाऱ्या वेस्ट कोस्ट टाइम्स व हेराल्डसाठी स्टाफ स्टाफ रिपोर्टर म्हणून काम केले.
मध्यंतरी फोंड्याहून दै. गोमंतकसाठी मराठीतून बातम्या पाठवल्या. शोधक वृत्तीने बातम्या काढून ते पाठवायला लागल्याने ते थोड्याच दिवसात प्रसिध्दीसआले. फोंडा पोलीस स्टेशनवर एका पोलीस निरीक्षकाने एका पिकअप ड्रॉयव्हरला पोलीस स्टेशनच्या समोर अडवून बूटाच्या लाथानी मारहाण केली. या घटनेचे फक्त त्यांनी हेराल्डमधून व मी मराठीतून सनसनाटी वृत्त फोटोसह प्रसिध्द केले. त्यामुळे फोंड्यातच नव्हे गोव्यात खळबळ झाली. फोंडा पोलीस स्टेशनवर मोर्चा सुध्दा आला. तोडफोड झाली. आणखी एक म्हणजे दमणमधून एकउपनिरीक्षक फोंडा पोलीसस्टेशनवर आला होता. त्यानेही एका कॉन्स्टेबला जबर मारहाण केली. तो गंभीर झाल्यावर त्याला तिस्क-फोंडा येथे डॉ. सिरसाटयांच्या इस्पितळात गुपचूप दाखल केले. आम्ही दोघानी त्या कॉन्स्टेबलची भेट घेतली. त्याची परिस्थिती गंभीर होती. बोलण्याच्या देखील मनस्थितीत नव्हता. या घटनेचे वृत्त आम्ही दोघांनीच दिले. त्यामुळे परत खळबळ झाली. व वरिष्ट पातळीवरून चौकशी सुरू झाली. सायंकाळी तो एका पत्रकाराला घेऊन केबीनमध्ये बसला होता. त्याचीही बाजू ऐकून घ्यावी म्हणून आम्ही त्याच्या केबीनात गेलो असता 'गेटऑऊट ' म्हणून आमच्यावर ओरडले. एकाकॉन्स्टेबलला बेल मारून बोलावले. आम्हाला बाहेर काढण्यासाठी. पण त्या पूर्वीच आम्ही बाहेर पडलो. तो पत्रकार आणि हा क्रूरकर्म पोलीस अधिकारीफिदीफिदी हसत होते. त्यावेळी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे होते. आणि केरी फोंडा येथे एका समारंभाला ते येणार होते. एक निवेदन तयार केले. व कार्यक्रम संपल्यावर श्री राणे यांची भेट घेऊन सविस्तर माहिती त्यांना दिली. श्री राणे मला ओळखत होते. ते म्हणाले ठीक आहे. त्याला परत दमणला पाठवतो. आणि काय आश्चर्य २४ तासाच्या आत त्याच्या हातात बदली ऑर्डर दिली. पत्रकारांना मान देणारा मुख्यमंत्री म्हणून आम्ही पुढे त्यांच्याकडे नेहमीच
आदराने पाहिले.
जॉन आणि माझी जोडी चांगलीच जमली होती. या काळात आम्हीदोघांनी अनेक प्रकरणांना वाचा फोडली सामाजिक प्रश्न हाताळले. गोवा -मराठी पत्रकार संघाचे आम्हीही सदस्य झालो. प्रत्येक कार्यक्रमात आम्ही सहभाग दाखवत होतो. पण नंतर संघात राजकारण आले. त्यांनी ग्रामीण पत्रकारांना बाजूला केले. मडगावचे तत्कालीन राष्ट्रमतचे प्रतिनिधी स्व. रत्नकांत पावसकर यांना हा अपमान सहन झाला नाही. त्यांनी ग्रामीण पत्रकार संघ स्थापन करण्याचा निर्धार केला. एक दिवस जॉन आणि पावसकर माझ्याकडे आले.
फोंडा तालुका पत्रकार संघ स्थापन करण्याचा निर्धार केला. लगेच हॉटेल पर्लच्या सभागृहात एक बैठक घेतली. बैठकीत रत्नकांत पावसकर यांनी मार्गदर्शन केले. नंतर कमिटी निवडली. माझी अध्यक्षपदी तर जॉन ची सेक्रेटरी म्हणून निवड झाली. इतर पदाधिकारी निवडले. त्यानंतर मडगाव, सावर्डेकुडचणे आदी ठिकाणी पत्रकार संघ स्थापन झाले. मध्यंतरी जॉन जरा विचित्रच वागायला लागला. बाहेरच्या लोकांना बरा. अनेक मित्रपरिवार जोडला,पण घरात पाऊल ठेवताच मस्ती करायला लागला.
एक दिवस त्याच्या आईने मला आडवून त्याच्या करणीचा पाडा वाचला. दरम्यान त्याने संघाच्या सेक्रेटरीपदाचाही राजिनामा दिला. मी त्याच्या घरीजाऊन विनंती केली. पाहिजे तर अध्यक्ष हो. पण संघात फूट नको, पण ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. मलाही जरा संशय आला. असा वागणारा जॉननव्हता. मी त्यांच्या आईचा निरोप घेऊन आमच्या पूर्वाचारी देवळात गेलो व त्याचे विषयी देवाचा प्रसाद घेतला तेव्हा देवाने त्याला देवीची मागणी असल्याच दाखवून दिले. मग देवी कोणती याचे स्पष्टीकरण घेतले असता कवळे च्या श्री शांतादुर्गेची मागणी होती. तरी मी त्याच्या आईला शांतादुर्गेला प्रसाद घेऊन खात्री करायला सांगितले. श्री शांतादुर्गा तिची कुलदेवी होती.'जॉन ला नेऊन देवीसमोर पाणी सोडले. तेव्हा पासून वागणुकीत फरक पडत गेला . आता जॉन श्री शांतादुर्गेला स्मरतो, जत्रा चुकवत नाही.बेळगाव मराठा लाईफ इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटर मध्ये आर्मी अॅटेचमेंट कॅम्पमध्ये दोनदा सहभाग दाखवला मध्यप्रदेशमध्ये २१ दिवसांच्या झालेल्या साहसी स्पर्धात अॅडव्हान्स सहभाग लिडरशीप कम्पमध्ये रॉक कलायमिंगचे प्रशिक्षण १ ९ ८२ साली घेतले.
केंद्रीय विदेश मंत्री एदुआर्द फालेरो यांचे त्यानी खाजगी सचीव म्हणून काम केले. त्यानंतर जाॅन ची माहिती खात्यात माहिती सहाय्यक म्हणून नीवड जाली. ते शूटर, गृहरक्षक (होमगार्ड) पणजी विभागाचे मानद कंपनी कमांडर ,पणजी ट्रॉफीकवार्डन म्हणून काम केले आहे. १ ९ ८२ व १ ९ ८३ साली गोवा ते पूणे आणी गोवा ते हैद्राबाद अशा सायकल प्रवासाच्या चमूचे नेतृत्व त्यांनी केले आहे.मध्यप्रदेशातील पचमडी येथे २१ दिवसांचे 'अॅडव्हान्स लिडरशीप विथ रॉक क्लायम्बींग ' या शिबिरासाठी गोव्यातून फक्त त्यांचीच निवड झालीहोती. मेजर ए.के. कोल्हटकर हे त्यांचे ट्रेनिंग ऑफिसर होते. त्यांच्या नेतृत्वाखाली बरेच अनुभव घेतले. या काळात २५ ते ३० फूट उंच चट्टान चढण्याचा अनुभव घेतला. मेजर चतुर्वेदी, कॅप्टन अहिम महमंद यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन तंत्रज्ञान व वैज्ञानिक पध्दतीचा अवलंब केल्याने मोठ मोठे चट्टान सहज चढता आले. हे क्षण अविस्मरणीय होते. मनाला आनंद देणारे जवळ
जवळ १०० फूटी महाकाय चट्टानाशी झुंज द्यायचाही अनुभव घेतला. एन.सी.सी. मुळे राष्ट्रीय एकात्मता कशी साधता येते याचा अनुभव याच शिबिरातूनघेतला. सुरवातीपासूनच त्यांच्यात धाडसी गुण होते. त्या गुणांचा आजही त्यांनां जागोजागी उपयोग होतो.
फोंडा तालुका पत्रकार संघाचे ते सचिव व सदस्य म्हणून काम करत असतांना आम्ही अनेक उपक्रम राबविले. विशेषता विद्यार्थासाठी वक्तृत्व स्पर्धा,समुहगीत गायन स्पर्धा, अखिल गोवा पातळीवर बॅडमिंटन स्पर्धा, बाल चित्रकला स्पर्धा, गुणीजनांचे सत्कार, अखिल गोता पातळीवर शामीण पत्रक मेळावे, -स्वरसम्राज्ञी गिरिजाताई, केळेकर स्मृती संगीत संमेलन, सर्वात महत्वाचे म्हणजे दरवर्षी पावसाळ्यात फोंडा शहरातील रस्त्याला मोठे मोठे खड्डे पडत. त्यामुळे दुचाकी वाहन चालवणेही अशक्य व्हायचे. वृत्तपत्रात बातम्या देवूनही संबधित अधिकारी व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करायचे. पत्रकार संघाने निर्णय घेतला रस्त्यावर पडलेल्या खड्डयांत झाडे लावून वनमहोत्सव साजरा करयचा, पत्रकार संघाचे सदस्य व नागरिकांना एकत्र आणून तीन वर्षे असा कार्यक्रम राबवला. तेव्हापासून रस्त्यांना तेवढ्याप्रमाणांत खड्डे पडणे बंद झाले. नागरिकांनी पत्रकार संघाचे कौतुक केलेच शिवाय सर्व प्रसार माध्यमानी दखल घेऊन मोठी प्रसिध्दी दिली. स्थानिक समस्या, वाहतूक व्यवस्था, पर्यावरण आदी विषयावर त्यांनी वर्तमानपत्रांतून लेखन केलेले आहे. आजवर त्यांनी १८ वेळा रक्तदान केलेले आहे.
त्यांचा ' पावला ' हा कोंकणी कविता संग्रह १ ९९ ६ रोजी प्रसिद्ध झाला त्यानंतर "गूलमोहर", "सांज", "वोल्यो यादि", "आॅफ साईड"(ईग्रजी निबंद) व "माडवीच्या देगे वेल्यान"(रोमन कोंकणी निबंद) प्रसिद्ध झाले."वोल्यो यादि" या कविता संग्रहाला कोकणी भाषा मंडळाचा साहित्य पूरस्कार लाभला.
अधून मधून त्यांच्या कविता व लेख आजही प्रसिध्द होत आहेत. दक्षिण गोवा पत्रकार संघाचे काही काळउपाध्यक्ष म्हणून काम केले व आजही ते सदस्य आहेत. पणजी येथे गुजचेही ते सदस्य होते .२००३ साली चेन्नई येथे झालेल्या मावळणकर राष्ट्रीय नेमबाजअजिंक्यपद स्पर्धेसाठी गोव्यातून निवड झालेल्या प्रतिनिधिंचे नेतृत्व त्यांनीच केले. आकाशवाणी,दूरदर्शनवरून त्यांच्या साहित्याचे व त्यांनी घेतलेल्या अनेक मान्यवरांच्या मुलाखती प्रसारीत झालेल्या आहेत. वेगवेगळ्या वृत्तपत्रातून ' करमचंद ' या टोपण नावाने प्रासंगिक लेख प्रसिद्ध झालेले आहेत. माइयाप्रमाणेच त्यांना समाजावर होत असलेल्या अन्यायाची चीड येते. मग त्यांची लेखणी सरसावते या त्यांच्या गुणांची मी नेहमीच कदर केलेली आहे. फोंडा जेसी , गोवा
मुंडकार कुळ संघटना, सारख्या संस्थामधून श्री रवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेले आहे. फोंडा तालुका पत्रकार संघाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांचा संघातर्फे सत्कार करण्यात आला.
ते माहिती विभागात एक कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याचे सिद्ध झाले. माहिती अधिकारी म्हणून त्यानी चांगली सेवा बजावली. त्यांनी गोवा पोलिस विभागाचे जनसंपर्क अधिकारी म्हणूनही काम पाहिले. होमगार्ड्समध्ये त्यांना मुख्यमंत्र्यांनी सुवर्ण पदक इ2007, 2012 मध्ये गुणवंत सेवांसाठी राष्ट्रपती पदक,२०१३ मध्ये डीजीसीडी प्रशंसा, 2014 मध्ये डीडीजी एनसीसी प्रशस्तिपत्र. २०२० मध्ये प्रतिष्ठित सेवांसाठी राष्ट्रपती पदक त्याना प्राप्त जाले. कवी तर होतेच पण या काळात ते गितकार म्हणूनही प्रसिध्द जाले.
वडिलांचाच कित्ता त्यांनी पुढे गिरवला त्यांनी हिंदू मुलीशीच लग्न केले. पत्नी सौ. सविता, मुलगा नवदीप, मुलगी अंजली, सून नव्या यांच्या सहवासात आपल्या संसाराला उभारी देत असताना वाट्याला येणारे खात्याअंतर्गत असो वा साहित्याचे असो ते काम तो ठाकठीकपणे करतोच. सर्वांशी मिळून मिसळून राहण्यातच समाधान मानतो. दोन्ही धर्माचे संस्कार झाल्याने दोन्ही धर्माच्या नियमांचे पालन करतात. आई-वडिल देवाला प्रिय झाल्याने कवळेची श्री शांतादुर्गा हीच आता त्यांची आई आहे. आईला न विसरता त्यांनी पुढे जावे याहूनही मोठा आणि मोठाच होत राहावा. आज त्यांच्या 60 व्या वाढदिवशी माइया त्यांच्यामागे पूर्ण शुभेछा आहे.
No comments:
Post a Comment