Konkani poet, writer, media person and lyricist

My photo
John Aguiar ( BA,BJ,MJ. ) is a Konkani poet, writer, media person and lyricist His song Viva Carnival, composed and sung by Mukesh Ghatwal was chosen as the Goa carnival theme song in 2012. . Aguiar wrote a bhakti geet on Lord Ganesha also composed and sung by Mukesh Ghatwal, a first of its kind in Konkani .Thereafter wrote several songs. Four books of Konkani poems ,one each English and romi konkani essays. Nominated for the best lyrics award at Mangalore, bagged KBM’s Literary Award in the year 2017. Gulab Writer of the Year Award ,The Navhind Times Ex-NCC Achiever Award. He bagged Goa CM’s Medal in Home Guards Presidents Medal for Meritorious , Presidents Medal for Distinguished Services DGCD Commendation 2013 and DDGNCC Commendation. Professionally, he was an officer with the Government of Goa's Department of Information and Publicity. Aguiar has been a journalist since his college days, associated with newspapers such as Herald, West Coast Times, Goencho Avaz, Rashtramat, Navhind Times, Gomantak and others.

Monday, June 29, 2020

SHRI AGUIAR RETIRES AFTER COMMENDABLE SERVICES IN DIP

 

Goa Khabar: Information Officer in the Department of Information and Publicity Shri John Aguiar today retired after 30 years of commendable service in the 
Department.Shri Aguiar joined the Department in April 1990 as Information Assistant and subsequently rose to the position of Information Officer. He had the opportunity of working in high offices on deputation. Shri Aguiar served as Assistant Private Secretary to then Union Minister of State Shri Eduardo Faleiro in the Ministry of External Affairs, Finance and Chemicals & Fertilizers. He served as Public Relations Officer of Goa Police Department from June 13, 2011 till December 8, 2017.
During his tenure as PRO, he displayed professional competence and liaised with the Press/media personnel and carried out image building of the Police Department successfully. He was the Nodal Officer of the Department of Information & Publicity in connection with hosting of the Civic Reception in honour of President of India Shri Ram Nath Kovind on July 7, 2018.
Attended "All India Public Communicators Workshop" organised by Department of Information & Public Relations, Government of Karnataka in Bangalore in December 2016. Though he joined as a B.A. graduate in the Department, he completed his Bachelor in Journalism and subsequently Master in Journalism while still in service. He was nominated as North Goa District ICON during the 2019 Lok Sabha General elections.
Shri Aguiar was member of media accreditation committee for media delegate registration for IFFI.
Shri Amar Sinha, IFS, Secretary Economic Relations commended the services of Shri Aguiar for the assistance provided as regards liaison with the local press/media and coordinatin at the airport and at the venue during the 8th BRICS summit in Goa on 15-16 October 2016, The services of Shri Aguiar were also commended by Lt. Gen. Rajiv Bhalla , CEO, OC-BFT for the support in press publicity during teh BRICS U-17 football cup in Goa. Shri Deepak Mani Tiwari, Deputy Commandant CISF Goa also appreciated the services of Shri Aguiar.
The Services of Shri Aguair were commended by then Secretary (Information & Publicity) Shri Narendra Kumar, IAS. then Chief Electoral Officer Shri Raajiv Yaduvanshi, IAS and then Joint CEO Shri R. P. Pal, IAS. Participated in skit competition on beti bachao beti padhao for Government employees as part of International day of the Girl child on October 6, 2018 which bagged second place. As Honorary Home Guards Company Commander, he had conducted several lectures and demonstration of Emergency rescue methods for NCC cadets during Annual Training camps and school children. He accompanied the Goa Press Accreditation Committee on a study tour to Mumbai, Delhi, Chandigarh and Punjab. He also accompanied Press Accreditation Committee of the Goa Legislature Secretariat on a study tour of Jaipur, Ajmer in Rajasthan.
In Home Guards, he bagged Goa Chief Minister's Gold Medal in 2007, Presidents Medal for Home Guards and Civil Defence for Meritorious Services 2012, Director General Civil defence, New Delhi commendation and Disk 2013 and Deputy Director General Commendation in 2014. His name was announced for President's Home Guard Medal for Distinguished Service on January 25, 2020. Shri Aguiar awas presentd a special recognition award by the Chief Electoral Officer at the National Voters Day on January 26, 2020 at the hands of Chief Secretary Shri Parimal Rai, IAS.
Shri Aguiar initiated two schemes in the Department, "The Goa State Journalist Awards" scheme and e Goa State Photo Contest and Exhibition Scheme -2014.Shri Aguuar was also Nodal Officer of Department of Information & Publicity on State Disaster Management Committee.

https://m.dailyhunt.in/news/india/english/goa+khabar+english-epaper-goaeng/john+aguiar+retires+after+commendable+service+in+dip-newsid-n195189514


Friday, June 5, 2020

JOHN AGUIAR: AGENT OF CHANGE





Article to celebrate 60th birthday on June 4, 2020.

ByRemedina Rodrigues



“I believe I’m unique, “he says. You could easily be led to assume John Aguiar is being uncharacteristically boastful. I use the term  ‘uncharacteristically’ because there is nothing about his demeanour to suggest he even possesses a smidgeon of arrogance. On the contrary, he is soft spoken, unassuming and an entirely easy person to converse with says Remediana Dias.

Given this it makes perfect sense that  his stand on a person’s uniqueness in not confined to himself alone. In fact, he believes alol human being are unique. “Ï consider myself merely as an agent of change. Each human being is moulded by the lives or actions of others who influence him/her. But even that influence take on a unique path with their personal interpretation and that’s what makes all of us unique.”

John Aguiar completes 60 years of professional service and retiring at the end of this month. John Aguiar has been with the Department of Information & publicity for past 30 years having joined the Department in April 1990. I am truly humbled to write about the man who inspired, whoshapedthe thinking and helped many to realize the potential of the profession to truly make a difference. Those who know him are aware of his passion for this profession and his addiction to work. He understood and enjoyed his vocation, and with sheer confidence, the next several years of work passed with lightning speed with notable achievements that are listed below. I want to express my personal appreciation for your achievement of this milestone. We take pride in your accomplishment and your commitment to excellence and in your hardwork and talent. Your achievements and success aren’t by accident. But they are a result of  spending what seem like hours of hard work and trying new ideas. During this incredible journey John Aguiar mentions that he learnt three key points: Accepting responsibility, embracing change, and respecting humanity.With your work, you have set the example for many to share in your dedication and commitment and to follow in your footsteps.



Starting from the “Best all-round student” and the “best NCC Cadet”awards in Chowgule college, Margao he has represent3ed Goa at the National Shooting Championship at Chennai, received award from Ponda Journalist Association for dedication in Journalism field, Chief Minister’s Gold Medal for Meritorious services in Home Guards, Presidents Home Guards medal for meritorious services,  Director General Civil Defence, MHA commendation and disc, Deputy Director General of NCC, Karnataka and Goa Commendation, Presidents Medal  for distinguished Services in Home Guards,  Konkani Bhasha Mandal’s literary award,  Gulab writer of the year award. He is a well known poet and lyrics writer who  has written several popular songs which are played on All India Radio and videos are uploaded on you tube. He has produced and presented several programmes including interviews, playlets and panel discussion on All India Radio and Doordarshan. Shri Aguiar’s Journalistic stints include Herald, West Coast Times, Goencho Avaz and Gomantak (Marathi). He also worked as Assistant Private Secretary to Union Minister in the Ministries of Fiance, External Affairs and Chemicals & Fertilizers. He has published books like Paulam, Gulmohar, Sanz, Offisde(Englsih), Olyo Yadi and Mandovichea dege voilen(Essays in Roman Konkani script).

“I don’t believe in shortcuts to achieve goals. I am of the view that each person makes his own destiny. I have tried to inculcate this value in my kids. I also believe hard work should be combined with fun. You have to make sure you enjoy every moment of your life while giving your best to work. I am passionate about life. I get up in the morning with a smile because every day is a new day and you cannot take it for granted.”

What are your strengths?

I am a person with a varied interests, my biggest strength, since I learn and grow all the time. I do every activity with the same intensity. My insatiable hunger for knowledge is my driving force.

I’m often asked how i manage to find time for everything. My answer is, when you like doing something, you make time for it. I believe time management is an extremely important skill in leading a fulfilling life. 

What inspires you?

My parents are my primary inspiration, more so my mother, I come from a middle class family, a self made man. Being only child in the family, I  have worked very hard and heeded my mother’s advise to aim high and make a difference with my life. From her, I learnt the most important tenant of life: the need to give. Reading biographies of famous people inspires me. My favourite book is Gitanjali by Nobel laureate Rabindranath Tagore. I believe it’s not just the financially underprivileged who need help, but also the emotionally deprived. You can be a rich man and have nobody to care for you. My father was loved and respected in the locality. He thought me life’s realities and to defend myself from external forces when time comes.

What is the secret of your success?

I think it is important to forgive, forget and move on. You should not dwell unnecessarily on the past. I am uncomplicated in my dealings with people. I refuse to hold grudges against anyone, because I strongly believe it is important to keep our minds clean in  order to sustain creativity.

In a word, what is the quality that defines you?

Authenticity. People know when you are genuine. They will also pick up when you are being false, no matter hom many illusion you wrap it with. I want to inspire people to make changes for the better through my stories and examples, rather than tell them to change.

***************************

Here is a list of the different roles John Aguiar undertook in his professional career.

·         INFORMATION OFFICER OF DEPARTMENT OF INFORMATION AND PUBLICITY, GOVT. OF GOA.



·         SERVED AS PUBLIC RELATIONS OFFICER OF GOA POLICE FOR FROM JUNE 13, 2011 TILL DECEMBER 8, 2017.



·         SERVING AS PUBLIC RELATIONS OFFICER FOR GOA BHARAT SCOUTS AND GUIDES ORGANISATION.



·         HONORARY COMPANY COMMANDER, HOME GUARDS ORGANISATION FOR PANAJI DIVISION.



·         ASSISTANT PRIVATE SECRETARY TO UNION MINISTER IN THE MINISTRIES OF EXTERNAL AFFAIRS.



·         ASSISTANT PRIVATE SECRETARY MINISTRY OF CHEMICALS AND FERTILIZERS IN NEW DELHI.



·         IIND P.A. UNIION MINISTER OF STATE FOR FINANCE IN THE MINISTRY OF FINANCE, GOVT. OF INDIA , NEW DELHI.



John Aguiar is the recipient of many awards. Listed below are the most important ones.   

·         AWARDED PRESIDENTS HOME GUARD AND CIVIL DEFENCE MEDAL FOR DISTINGUISHED SERVICES IN THE HOME GUARDS ORGANISATION. (ANNOUNCED ON JANUARY 25, 2020)





·         AWARDED GOA CHIEF MINISTER'S  GOLD MEDAL FOR MERITORIOUS SERVICES IN THE HOME GUARDS ORGANISATION WHICH WAS PRESENTED TO HIM ON DECEMBER 19, 2007.





·         AWARDED PRESIDENTS HOME GUARD AND CIVIL DEFENCE MEDAL FOR MERITORIOUS SERVICES IN THE HOME GUARDS ORGANISATION ON  WHICH WAS PRESENTED TO HIM ON AUGUST 15, 2012.





·         AWARDED DIRECTOR GENERAL OF CIVIL DEFENCE, MINISTRY OF HOME AFFAIRS,GOVT. OF INDIA COMMENDATION FOR MERITORIOUS SERVICES IN THE HOME GUARDS ORGANISATION ON  WHICH WAS PRESENTED TO HIM ON APRIL 25, 2015.



·         AWARDED DEPUTY DIRECTOR GENERAL OF NCC COMMENDATION CERTIFICATE FOR ASSISTANCE TO NCC ORGANISATION  ON JUNE 3, 2016.



·         AWARDEDSARVA  DHARMA BHAKTI PURASKAR 2011( April 2, 2011) SHRI SHRI SADGURI PAWADESHWAR MAHARAJ JI   ASHND SHRI SADGURI  BHAU MAHARAJ JI AT GAYATRI PEETH, TALEWADA, BETORA, PONDA GOA.



·         ACHIEVMENT AWARD IN RECOGNITION OF VALUABLE SERVICES IN THE FIELD OF MEDIA BY THE SOUTH GOA JOURNALISTS ASSOCIATION ON AUGUST 1, 2015..





·         AWARDED SAMAJ GAURAV PURASKAR BY KENDRIYA MANAVADHIKAR SANGATHANN, NEW DELHI DDURING  THEIR NATINAL CONFERENCE IN PANAJI ON MARCH 8, 2020 ON THE OCCASION OF WOMEN’S DAY.





·         AWARDED “MRS. HIRA WAGH BEST ALL ROUND STUDENT” IN SMT PARVATIBAI CHOWGULE COLLEGE, MARGAO - 1984. DURING HIS B.A. DEGREE COURSE.



·         NOMINATED FOR THE BEST LYRICS AWARD AT THE KALANGAN, WORLD KONKANI MUSIC AWARDS AT MANGALORE IN 2010.



·         AWARDED “GULAB” WRITER OF THE YEAR AWARD IN  2011





·         AWARDED THE NAVHIND TIMES EX-NCC ACHIEVER AWARD FOR LITERATURE ON JUNE 30, 2012.



·         SHRI AGUIAR BAGGED KONKANI BHJASHA MANDAL’S ROCK BARRETO LITERARY AWARD IN THE YEAR 2017 FOR HIS BOOK  “OLYO YADI”.



·         AWARDED VOCATIONAL AWARD OF THE ROTARY CLUB OF PANJIM.

     



·         REPRESENTED GOA STATE AT THE MAULANKAR NATIONAL SHOOTING CHAMPIONSHIP AT CHENNAI-2003.



·         HIS  SONG , “VIVA CARNIVAL” COMPOSED AND SUNG  BY SHRI MUKESH GHATWAL WAS CHOSEN AS CARNIVAL ANTHEM IN THE YEAR 2012.



·         PATRAKAR MITRA AWARD BY SANGUEM-QUEPEM BY PATRAKAR SANGH IN 2009.



·         SPECIAL RECOGNITION AWARD BY THE ELECTION COMMISSION FOR HIS CONTRIBUTION TO CONDUCT ELECTIONS ON THE OCCASION ON NATIONAL VOTERS DAY, JANUARY 25, 2020.

His other achievements include:



·         WELL KNOWN POET IN GOA.  LYRICIST. HAS PENED SEVERAL VERY POPUPAR  KONKANI SONGS IN GOA WHICH ARE ON ALL INDIA RADIO AND CD’S.



·         HIS KONKANI POETRY HAS BEEN SELECTED FOR IXTH STD. KONKANI TEXT BOOKS FROM THIS ACADEMIC YEAR -2020-21.



·         HAS WRITTEN SIX BOOKS.  FOUR ON KONKANI POEMS AND ONE ENGLISH ESSAY BOOK AND ANOTHER ESSAY BOOK IN ROMAN KONKANI. ONE MORE BOOK ON SHORT PLAY IN KONKANI ROMAN SCRIPT IS TO BE PRINTED AND PUBLISHED SHORTLY.



·          HAS ALSO WRITTEN SEVERAL ARTICLES ON SOCIAL THEMES ON LOCAL NEWSPAPERS.





·         SHRI AGUIAR  WROTE BHAKTI GEET ON LORD GANESHA WHICH WAS AGAIN COMPOSED AND MUSIC ARRANGED AND SUNG BY MUKESH GHATWAL. THE VIDEO OF THIS SONG WAS RELEASED ON SEPTEMBER 8, 2018, FIRST OF ITS KIND IN KONKANI LANGUAGE.



·         APART FROM ALL INDIA RADIO HIS SONGS ARE IN POPULAR CDS LIKE  “VALLEY OF COLORZ”, “EK NATEM”, “BUYAO ROCKS” SO ALSO  DEVOTIONAL CDS LIKE “GRATEFUL TO JESUS” AND “HEY DAMODARA” BY WELL KNOWN MUSIC COMPOSER SHRI SIDDHNATH BUYAO.



·         HIS ONE MORE SONG ON LORD DAMODARA SINGLE SOLO WAS COMPOSED BY SHRI DILIP VAZE AND SUNG BY SAMIKSHA BHOBE.



·         PRESENTLY WORKING ON ANOTHER BOOK IN KONKANI ROMAN SCRIPT.



·         FOUNDED EX-NCC CADETS ASSOCIATION-GOA TO MOTIVATE YOUNG GOANS TO JOIN THE NCC AND EVENTUALLY INDIAN ARMED FORCES. HE WAS ITS PRESIDENT FOR SIX YEARS.



·         HAS BEEN CONDUCTING CAREER GUIDANCE WORKSHOPS ON THE INDIAN ARMED FORCES.



·         HAS WORKED IN THE FIELD OF ANTI DRUGS CAMPAIGN BY ORGANISING CYCLE RALLIES, STREET PLAYS AND PANEL DISCUSSIONS ON THE SUBJECT ON DOORDARSHAN.

धाडसी व्यक्तिमत्व : जॉन आगियार



-गोकूळदास मूळवी





रामनाथी येथे श्री रामनाथ सभागृहात एका संस्थेचाकार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला  मी पत्रकार म्हणून उपस्थित होतो. कार्यक्रम सुरू होण्यास थोडा उशीर होता. इतक्यात माइयाजवळ एक मुलगा आला व म्हणाला तू मुळवी  न्ही? ' मी म्हटले होय. तो म्हणाला माझी आईतुझी आणि तू लिहिलेल्या तूं आई आहेस का? ' या नाटकाची खूप स्तुती करत आहे. असे सांगून त्यांनी माझ्याशी संवाद साधला. आपण श्री हर्डीकर गुरुजींकडून मराठी भाषा शिकत आहे. मला लेखनाची आवड आहे. मी त्याला म्हठले लिहित राहा. आणि वाचनाची गोडी लावून घे. माझी काही मदत हवी असल्यास मी द्यायला तयार आहे. ही आमची पहिली ओळख होती. नंतर ते शिकत राहिले. कधी-मधी भेट झाली तर थोडेसे बोलणे. मी माझी शिक्षकाची नोकरी सांभाळून नवप्रभा राष्ट्रमत व तरुण भारतात फोंड्याच्या बातम्या देण्याचे काम करत होतो. पुढे पुढे हा जॉन आगियार माझा मित्र बनला. घरात आई-वडीलाचा एकुलता एक मुलगा त्यांची उंडे 'काकणे बनविण्याची तिस्क-फोंडा येथे घरातच भट्टी (खोर्न) होते. वडील ख्रिश्चनं तर आई. हिन्दु सारस्वत-ब्राह्मण  समाजातील. वत्स गोत्री. आपल्या आई-वडिलांचे गुण घेऊन जन्माला आलेला हा मुलगा. त्याचे नाव त्यांनी जॉन असे ठेवले. घरातच नाही शेजाऱ्यासाठी तो लाडका बनला: शिकत असतानाच त्यांनी लेखनाला सुरवात केली. चौगुले महाविद्यालयांत-शिकत असतांना कॉलेज जीवनात व शालेय जीवनात विविध स्पर्धात भाग घेऊन पारितोषिके पटकावली. चौगुले महाविद्यालयातून बी.ए. पर्यंत पदवी संपादन केल्यानंतर साळगावकर कायदा महाविद्यालयात कायदेविषयक शिक्षण घेण्यासाठी प्रवेश केला पण अपरिहार्य कारणास्तव हे शिक्षण अर्ध्यावर सोडावेलागले. पिंड लेखकाचा असल्याने वयाच्या १८ व्या वर्षी ओ हेराल्ड या पोर्तुगीजकोंकणी वर्तमानपत्राच्या कोंकणी विभागात काम केले. हे करत असतानाच फोटो जर्नालीझम चेही प्रशिक्षण घेतले. मडगावहून प्रसिध्द होणाऱ्या वेस्ट कोस्ट टाइम्स व हेराल्डसाठी स्टाफ स्टाफ रिपोर्टर म्हणून काम केले.
मध्यंतरी फोंड्याहून दै. गोमंतकसाठी मराठीतून बातम्या पाठवल्या. शोधक वृत्तीने बातम्या काढून ते पाठवायला लागल्याने ते थोड्याच दिवसात प्रसिध्दीसआले. फोंडा पोलीस स्टेशनवर एका पोलीस निरीक्षकाने एका पिकअप ड्रॉयव्हरला पोलीस स्टेशनच्या समोर अडवून बूटाच्या लाथानी मारहाण केली. या घटनेचे फक्त त्यांनी हेराल्डमधून व मी मराठीतून सनसनाटी वृत्त फोटोसह प्रसिध्द केले. त्यामुळे फोंड्यातच नव्हे गोव्यात खळबळ झाली. फोंडा पोलीस स्टेशनवर मोर्चा सुध्दा आला. तोडफोड झाली. आणखी एक म्हणजे दमणमधून एकउपनिरीक्षक फोंडा पोलीसस्टेशनवर आला होता. त्यानेही एका कॉन्स्टेबला जबर मारहाण केली. तो गंभीर झाल्यावर त्याला तिस्क-फोंडा येथे डॉ. सिरसाटयांच्या इस्पितळात गुपचूप दाखल केले. आम्ही दोघानी त्या कॉन्स्टेबलची भेट घेतली. त्याची परिस्थिती गंभीर होती. बोलण्याच्या देखील मनस्थितीत नव्हता. या घटनेचे वृत्त आम्ही दोघांनीच दिले. त्यामुळे परत खळबळ झाली. व वरिष्ट पातळीवरून चौकशी सुरू झाली. सायंकाळी तो एका पत्रकाराला घेऊन केबीनमध्ये बसला होता. त्याचीही बाजू ऐकून घ्यावी म्हणून आम्ही त्याच्या केबीनात गेलो असता 'गेटऑऊट म्हणून आमच्यावर ओरडले. एकाकॉन्स्टेबलला बेल मारून बोलावले. आम्हाला बाहेर काढण्यासाठी. पण त्या पूर्वीच आम्ही बाहेर पडलो. तो पत्रकार आणि हा क्रूरकर्म पोलीस अधिकारीफिदीफिदी हसत होते. त्यावेळी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे होते. आणि केरी फोंडा येथे एका समारंभाला ते येणार होते. एक निवेदन तयार केले. व कार्यक्रम संपल्यावर श्री राणे यांची भेट घेऊन सविस्तर माहिती त्यांना दिली. श्री राणे मला ओळखत होते. ते म्हणाले ठीक आहे. त्याला परत दमणला पाठवतो. आणि काय आश्चर्य २४ तासाच्या आत त्याच्या हातात बदली ऑर्डर दिली. पत्रकारांना मान देणारा मुख्यमंत्री म्हणून आम्ही पुढे त्यांच्याकडे नेहमीच
आदराने पाहिले.
जॉन आणि माझी जोडी चांगलीच जमली होती. या काळात आम्हीदोघांनी अनेक प्रकरणांना वाचा फोडली सामाजिक प्रश्न हाताळले. गोवा -मराठी पत्रकार संघाचे आम्हीही सदस्य झालो. प्रत्येक कार्यक्रमात आम्ही सहभाग दाखवत होतो. पण नंतर संघात राजकारण आले. त्यांनी ग्रामीण पत्रकारांना बाजूला केले. मडगावचे तत्कालीन राष्ट्रमतचे प्रतिनिधी स्व. रत्नकांत पावसकर यांना हा अपमान सहन झाला नाही. त्यांनी ग्रामीण पत्रकार संघ स्थापन करण्याचा निर्धार केला. एक दिवस जॉन आणि पावसकर माझ्याकडे आले.
फोंडा तालुका पत्रकार संघ स्थापन करण्याचा निर्धार केला. लगेच हॉटेल पर्लच्या सभागृहात एक बैठक घेतली. बैठकीत रत्नकांत पावसकर यांनी मार्गदर्शन केले. नंतर कमिटी निवडली. माझी अध्यक्षपदी तर जॉन ची सेक्रेटरी म्हणून निवड झाली. इतर पदाधिकारी निवडले. त्यानंतर मडगावसावर्डेकुडचणे आदी ठिकाणी पत्रकार संघ स्थापन झाले. मध्यंतरी जॉन जरा विचित्रच वागायला लागला. बाहेरच्या लोकांना बरा. अनेक मित्रपरिवार जोडला,पण घरात पाऊल ठेवताच मस्ती करायला लागला.
एक दिवस त्याच्या आईने मला आडवून त्याच्या करणीचा पाडा वाचला. दरम्यान त्याने संघाच्या सेक्रेटरीपदाचाही राजिनामा दिला. मी त्याच्या घरीजाऊन विनंती केली. पाहिजे तर अध्यक्ष हो. पण संघात फूट नकोपण ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. मलाही जरा संशय आला. असा वागणारा जॉननव्हता. मी त्यांच्या आईचा निरोप घेऊन आमच्या पूर्वाचारी देवळात गेलो व त्याचे विषयी देवाचा प्रसाद घेतला तेव्हा देवाने त्याला देवीची मागणी असल्याच दाखवून दिले. मग देवी कोणती याचे स्पष्टीकरण घेतले असता कवळे च्या श्री शांतादुर्गेची मागणी होती. तरी मी त्याच्या आईला शांतादुर्गेला प्रसाद घेऊन खात्री करायला सांगितले. श्री शांतादुर्गा तिची कुलदेवी होती.'जॉन ला नेऊन देवीसमोर पाणी सोडले. तेव्हा पासून  वागणुकीत फरक पडत गेला . आता जॉन श्री शांतादुर्गेला स्मरतोजत्रा चुकवत नाही.बेळगाव मराठा लाईफ इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटर मध्ये आर्मी अॅटेचमेंट कॅम्पमध्ये दोनदा सहभाग दाखवला मध्यप्रदेशमध्ये २१ दिवसांच्या झालेल्या साहसी स्पर्धात अॅडव्हान्स सहभाग लिडरशीप  कम्पमध्ये रॉक कलायमिंगचे प्रशिक्षण १ ९ ८२  साली घेतले.

केंद्रीय विदेश मंत्री  एदुआर्द फालेरो यांचे त्यानी खाजगी सचीव म्हणून काम केले.  त्यानंतर जाॅन ची माहिती खात्यात माहिती सहाय्यक म्हणून नीवड जाली.  ते शूटरगृहरक्षक (होमगार्ड) पणजी विभागाचे मानद कंपनी कमांडर ,पणजी ट्रॉफीकवार्डन म्हणून काम केले आहे. १ ९ ८२ व १ ९ ८३ साली गोवा ते पूणे आणी गोवा ते हैद्राबाद अशा सायकल प्रवासाच्या चमूचे नेतृत्व त्यांनी केले आहे.मध्यप्रदेशातील पचमडी येथे २१ दिवसांचे 'अॅडव्हान्स लिडरशीप विथ रॉक क्लायम्बींग या शिबिरासाठी गोव्यातून फक्त त्यांचीच निवड झालीहोती. मेजर ए.के. कोल्हटकर हे त्यांचे ट्रेनिंग ऑफिसर होते. त्यांच्या नेतृत्वाखाली बरेच अनुभव घेतले. या काळात २५ ते ३० फूट उंच चट्टान चढण्याचा अनुभव घेतला. मेजर चतुर्वेदीकॅप्टन अहिम महमंद यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन तंत्रज्ञान व वैज्ञानिक पध्दतीचा अवलंब केल्याने मोठ मोठे चट्टान सहज चढता आले. हे क्षण अविस्मरणीय होते. मनाला आनंद देणारे जवळ
जवळ १०० फूटी महाकाय चट्टानाशी झुंज द्यायचाही अनुभव घेतला. एन.सी.सी. मुळे राष्ट्रीय एकात्मता कशी साधता येते याचा अनुभव याच शिबिरातूनघेतला. सुरवातीपासूनच त्यांच्यात धाडसी गुण होते. त्या गुणांचा आजही त्यांनां जागोजागी उपयोग होतो.

फोंडा तालुका पत्रकार संघाचे ते सचिव व सदस्य म्हणून काम करत असतांना आम्ही अनेक उपक्रम राबविले. विशेषता विद्यार्थासाठी वक्तृत्व स्पर्धा,समुहगीत गायन स्पर्धाअखिल गोवा पातळीवर बॅडमिंटन स्पर्धाबाल चित्रकला स्पर्धागुणीजनांचे सत्कारअखिल गोता पातळीवर शामीण पत्रक मेळावे, -स्वरसम्राज्ञी गिरिजाताईकेळेकर स्मृती संगीत संमेलनसर्वात महत्वाचे म्हणजे  दरवर्षी पावसाळ्यात फोंडा शहरातील रस्त्याला मोठे मोठे खड्डे पडत. त्यामुळे दुचाकी वाहन चालवणेही अशक्य व्हायचे. वृत्तपत्रात बातम्या देवूनही संबधित अधिकारी व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करायचे. पत्रकार संघाने निर्णय घेतला रस्त्यावर पडलेल्या खड्डयांत झाडे लावून वनमहोत्सव साजरा करयचापत्रकार संघाचे सदस्य व नागरिकांना एकत्र आणून तीन वर्षे असा कार्यक्रम राबवला. तेव्हापासून रस्त्यांना तेवढ्याप्रमाणांत खड्डे पडणे बंद झाले. नागरिकांनी पत्रकार संघाचे कौतुक केलेच शिवाय सर्व प्रसार माध्यमानी दखल घेऊन मोठी प्रसिध्दी दिली. स्थानिक समस्यावाहतूक व्यवस्थापर्यावरण आदी विषयावर त्यांनी वर्तमानपत्रांतून लेखन केलेले आहे. आजवर त्यांनी १८ वेळा रक्तदान केलेले आहे.

त्यांचा पावला हा कोंकणी कविता संग्रह १ ९९ ६ रोजी प्रसिद्ध झाला त्यानंतर "गूलमोहर", "सांज", "वोल्यो यादि", "आॅफ साईड"(ईग्रजी निबंद) व "माडवीच्या देगे वेल्यान"(रोमन कोंकणी निबंद) प्रसिद्ध झाले."वोल्यो यादि" या कविता संग्रहाला कोकणी भाषा मंडळाचा साहित्य पूरस्कार लाभला.
अधून मधून त्यांच्या कविता व लेख आजही प्रसिध्द होत आहेत.  दक्षिण गोवा पत्रकार संघाचे काही काळउपाध्यक्ष म्हणून काम केले व आजही ते सदस्य आहेत. पणजी येथे गुजचेही ते सदस्य होते .२००३ साली चेन्नई येथे झालेल्या मावळणकर राष्ट्रीय नेमबाजअजिंक्यपद स्पर्धेसाठी गोव्यातून निवड झालेल्या प्रतिनिधिंचे नेतृत्व त्यांनीच केले. आकाशवाणी,दूरदर्शनवरून त्यांच्या साहित्याचे व त्यांनी घेतलेल्या अनेक मान्यवरांच्या मुलाखती प्रसारीत झालेल्या आहेत. वेगवेगळ्या वृत्तपत्रातून करमचंद या टोपण नावाने प्रासंगिक लेख प्रसिद्ध झालेले आहेत. माइयाप्रमाणेच त्यांना समाजावर होत असलेल्या अन्यायाची चीड येते. मग त्यांची लेखणी सरसावते या त्यांच्या गुणांची मी नेहमीच कदर केलेली आहे. फोंडा जेसी गोवा
मुंडकार कुळ संघटनासारख्या संस्थामधून श्री रवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेले आहे. फोंडा तालुका पत्रकार संघाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांचा संघातर्फे सत्कार करण्यात आला.

ते माहिती विभागात एक कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याचे सिद्ध झाले. माहिती अधिकारी म्हणून त्यानी चांगली सेवा बजावली. त्यांनी गोवा पोलिस विभागाचे जनसंपर्क अधिकारी म्हणूनही काम पाहिले. होमगार्ड्समध्ये त्यांना मुख्यमंत्र्यांनी सुवर्ण पदक इ2007, 2012 मध्ये गुणवंत सेवांसाठी राष्ट्रपती पदक,२०१३ मध्ये डीजीसीडी प्रशंसा,  2014 मध्ये डीडीजी एनसीसी प्रशस्तिपत्र. २०२० मध्ये प्रतिष्ठित सेवांसाठी राष्ट्रपती पदक त्याना प्राप्त जाले. कवी तर होतेच पण या काळात ते गितकार म्हणूनही प्रसिध्द जाले.

वडिलांचाच कित्ता त्यांनी पुढे गिरवला त्यांनी हिंदू मुलीशीच लग्न केले. पत्नी सौ. सवितामुलगा नवदीपमुलगी अंजलीसून नव्या यांच्या सहवासात आपल्या संसाराला उभारी देत असताना वाट्याला येणारे खात्याअंतर्गत असो वा साहित्याचे असो ते काम तो ठाकठीकपणे करतोच. सर्वांशी मिळून  मिसळून राहण्यातच समाधान मानतो. दोन्ही धर्माचे संस्कार झाल्याने दोन्ही धर्माच्या नियमांचे पालन करतात. आई-वडिल देवाला प्रिय झाल्याने कवळेची श्री शांतादुर्गा हीच आता त्यांची आई आहे. आईला न विसरता त्यांनी पुढे जावे याहूनही मोठा आणि मोठाच होत राहावा.      आज त्यांच्या 60 व्या वाढदिवशी माइया त्यांच्यामागे पूर्ण शुभेछा आहे.

समाजातील अडलेल्या नडलेल्यांना मदत करण्यात अग्रेसर असणारे व्यक्तीमत्व: जाॅन आगियार



-श्याम गांवकर







जीवनात यशप्राप्त करणे ही प्रत्येक माणसाच्या मनातील मनीषा. जीवनाच्या प्रत्येक वळणावरून पुढे जात असताना मनात स्वताच्या सामर्थ्यावर विश्वास ठेऊन जगाला गवसणी घालण्याची मनीषा बाळगणारे जीवनात यशस्वी होतात. वास्तविक यश म्हणजे काय याची व्याख्या करता येत नाही पण स्वताच्या क्षमतेनुसार स्वताला जे हवं ते मिळवता येणं म्हणजे यश असं मानलं जातं.
      यशवंताच्या ह्या चौकटीत समविष्ठ होणारे माझे वरिष्ठ सहकारी श्री. जॉन आगियार यांचे नाव अग्रक्रमांकाने घेण्याचा मोह मला टाळता येत नाही. अष्टपैलु व्यक्तीमत्वाचा सार मला या व्यक्तीमत्वामध्ये दिसतो. एक सुशील अधिकारी, लेखनाच्या प्रतिभेतून साहित्य विश्वावर आदिपत्य गाजवणारा लेखक, कवी, पत्रकारितेच्या क्षेत्रात दैदिप्यमान प्रतिभा असलेला पत्रकार अशा विविधांगी भुमिका साकारणारा निगर्वी व सालस व्यक्तीमत्व जे ४ जून रोजी आपली साठी साजरी करत आहे.
     समाजातील अडलेल्या नडलेल्यांना मदत करण्यात अग्रेसर असणारे हे व्यक्तीमत्व सर्वसामान्यावर झालेला अन्याय दूर करण्यात मदत अग्रेसर असणारे व्यक्तीमत्व म्हणून माहिती आणि प्रसिध्दी खात्यात त्यांची ओळख. कधीही त्याच्याकडे गेलो की हसतमुखाने चेष्टा मस्करीने येणा-यांचे स्वागत करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे त्यांच्या भेटीसाठी जाणा-या माणसाचे दुःख आपसुकच कमी होते व जॉन समोरच्या माणसाला आपला माणूस असल्यासारखे वाटायला लागते.
     समाजात वावरत असताना प्रत्येकाने आवश्यक असणा-या बदलांची सुरवात स्वतापासून करावी आणि आपल्याला वाटणारे परिवर्तन आपण स्वता घडवावं असं श्री. आगियार यांच मत, ज्या ज्यावेळी त्यांच्याकडे दैनदिन कामाची एकादी फाईल घेऊन गेलो की ते म्हणायचे सुरवात कर, हवी तेथे मदत मी करेन, याचाच अर्थ असा होतो की माणसाच्या आयुष्यात बाहेरचं कुणीतरी येऊन काहीतरी बदल घडवेल अशी अपेक्षाच बाळगणे मुळात गैर असते, असा तो अप्रत्यक्ष पणे प्रत्येकाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो.
     कितीही जटीला समस्या त्यांच्याकडे घेऊन गेलो की ती चुटकी सरशी सुटत नसते हे माहित असल्याने काही वेळ घेऊन त्यावर साधन-बाधक चर्चा करून सोडविण्याची हुशारी आणि त्यासाठी लागणारे कसब त्याच्याकडे नक्कीच आहे. कारण जॉनकडे संयमाचा खजिनाच आहे.
     श्री. जॉन आगियार म्हणजे विविध रूपांचा मसिहा समाजात आपल्याला विविध प्रकारची माणसं मिळतात. पैकी काहीजण खाजगी जीवनात मिळालेल्या यशामुळे हुरळून जातात. कारण त्यांनी यश मिळविण्यासाठी आणि ते पचविण्यासाठी लागणारी तपश्चर्याच केलेली नसते. यश मिळालं सर्वकाही मिळालं, अशी काही लोकांची धारणा असते. जॉन मात्र अशा गोष्टीना अपवाद ठरतो. सर्व सामान्यात वावरताना त्यांचा निरागसपणा साक्ष देतो. साधी राहाणी आणि उच्च विचारांची सांगड घालून जीवन व्यथीत करणारा जॉन आगियार सर्वसामान्याना हवाहवासा वाटतो कारण त्याच्यात मीपणा कधिच दिसला नाही.
     जीवनातील तीन टप्पे साकारत असताना जॉन आगियार यांनी अनेक संकष्टांनाही तोंड दिले. गरिबीतून वर आलेला जॉन म्हणजे जिद्द, चिकाटी आणि यश यांचे मूर्तीमंत उदाहरण आहे. लहानपणात विविध समस्यांना तोंड देत त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.  त्याच्या जीवनाला खरी कलाटणी मिळाली. कॉलेज जीवनात अंगात असलेल्या कल्पक कलागुणांमूळे जॉन कॉलेज जीवनात बराच बहरला. विविध स्पर्धातून त्यांनी आपल्या अंगात असलेल्या कलागुणांच्या छापेमूळे जनमानसात आपले नाव केले. वेळोवेळी मिळालेल्या प्रोत्साहानामुळे तो अधिकच बहरत गेला या सर्वाची परिणीती म्हणजे आजचे त्याचे अष्टपैलू व्यक्तीमत्व समोर दिसते.
     गोवा शासनाच्या माहिती आणि प्रसिध्दी खात्यात माहिती सहाय्यक ते माहिती अधिकारी पदांवर काम करत असताना त्यांनी विविध महत्वाच्या जबाबदा-या पार पाडल्यात. खात्यातील कामाव्यतिरिक्त इतर क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबध्दल विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. होमगार्ड विभागात स्वेच्छेने काम करत असताना त्यानी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना २००७ मध्ये मुख्यमंत्री स्वर्णपदक प्राप्त झाले. २०१२ मध्ये दर्जेदार सेवेसाठी त्यांना राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित करण्यात आले व २०२० मध्ये परत एकदा त्यांची राष्ट्रपती पदकासाठी निवड झाली आहे. याशिवाय इतर अनेक छोट्यामोठ्या पुरस्कारांनी त्यांनी राज्य तसेच राज्याबाहेर सन्मानित करण्यात आले आहे.
     श्री. जॉन आगियार यांनी आपल्या जीवनात माहिती खात्यात काम करत असतानाच इतर क्षेत्रातही डेप्युटेशन पध्दतीने काम केलेले आहे. १९९०  मध्ये त्यांनी तत्कालीन केंद्रीय विदेश मंत्री श्री. एदुआर्द फालेरो यांचे खाजगी सचिव म्हणून काम पाहिले आहे. गोवा पोलीस खात्याचे जनसंपर्क अधिकारी म्हणूनही त्यांनी १३/०६/२०११ ते ०८/१२/२०१७ या काळात काम पाहिले आहे. गृहरक्षक दलाचे कंपनी कमांडर म्हणून त्यांनी २००२ ते जून २०२० या काळात काम केले आहे. शिवाय अनेक शिबिरांमध्ये त्यांनी सहभाग घेऊन आपली चुणूक दाखवलेली आहे.
     साहित्य क्षेत्रातही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. वेगवेगळ्या विषयांवर लिहिण्याची कसब त्यांच्या लेखणीतून दिसते. त्यांचा पावला हा कोंकणी काव्याचे पुस्तक १९९६ साली प्रसिध्द झाले. त्यानंतर सांज, गुलमोहर, वल्यो यादी ही कोकणी पुस्तके प्रसिध्द झाली. ऑफ साईड हे इंग्रजी निबंधाचे पुस्तक त्यांनी लिहून प्रसिध्द केले आहे व मांडविच्या देगेवेल्यान हे रोमन कोकणीमध्ये निबंधाचे पुस्तक त्यांच्या नावावर आहे. त्यांनी लिहिलेल्या वल्यो यादी या कविता संग्रहाला कोंकणी भाषा मंडळाचा साहित्य पुरस्कारही प्राप्त झालेला आहे.
     श्री. जॉन आगियार यांनी पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्याचा गोव्यातील नामांकीत पत्रकार संघटनानी सत्कार व गौरव केलेला आहे. यामध्ये २००६ मध्ये फोंडा पत्रकार संघटना, २००९ मध्ये सावर्डे-केपे पत्राकर संघटना, अंत्रूज शिगमोत्सव समिती, २००५ दक्षिण गोवा पत्रकार संघटना आणि २०१८ साली अखिल गोमंतक नाभिक समाजातर्फे त्यंना गौरविण्यात आलेले आहे. २००९ मध्ये सांगे-केपे पत्रकार संघातर्फे पत्रकारमित्र पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेले आहे.
     पत्रकारीतेत त्यांनी गोंयचो आवाज या मासिकामधून लिहीण्याला सुरवात केली तद्नंतर दैनिक हेराल्ड या इंग्रजी दैनिकासाठी वार्ताहर म्हणून काम केले. गोमंतक या वर्तमान पत्रासाठी त्यांनी फोंडा प्रतिनिधी म्हणून काम पाहिलेले आहे. याशिवाय वेस्ट कोस्ट टाईम्स व  गुलाब मासिकासाठी कॉलम रायटर म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे.
     पदवी शिक्षणानंतर  श्री. जॉन आगियार यांनी पुणे टिळक विध्यापिठातून पत्रकारीतेत पदवी संपादन केली व एका वर्षानंतर पत्रकारीता विषय घेऊन मास्टर डिग्री घेतली. त्यांच्यामते शिक्षण म्हणजेच सर्वकाही असते असे नाही तो नेहमी म्हणतो अनुभवातून माणूस खूप काही शिकत असतो. त्यांच्या मते एखादा जटील प्रश्न चुटकीसरशी सुटत नसतो तर तो सोडविण्यासाठी माणुस हुशार असावा लागतो. माणसाकडे संयम असायला हवा. कदाचित एखादा प्रश्न सोडवताना सभोवतालचे सगळेच खूश होणारे असतात असे नाही, मात्र त्यांचे समाधान होणे गरजेचे असते. हा कित्ता प्रत्येकाने जीवनात गिरवायला हवा असे त्याचे प्रांजळ मत.
     जीवनात प्रत्येकासमोर अडचणीचे अनंत डोंगर असतात अशावेळी माणसांनी धीर सोडायचा नसतो तर मार्ग काढायचा असतो या पर्यायाची शिकवण श्री. जॉन आगियार यांच्याकडून मी शिकलेलो आहे. शिवाय जे द्यायचे ते हृद्यातून द्यावे आणि जे मौनातून व्यक्त होतं, ते तितकं प्रभावीपणे कधी शब्दांमधून व्यक्त करता येत नाही, ही श्री. जॉन आगियार यांची खास जीवनप्रणाली होय, त्यांना साठीच्या खुप शुभेच्छा.

Thursday, June 4, 2020

जनतेशी सख्य जोडणारा अधिकारीः जॉन आगियार


-   दुर्गाकुमार श्रीकृष्ण नावती




-     
     गोव्याच्या माहिती आणि प्रसिध्दी खात्यातील अधिकारी जॉन आगियार हे चतुरस्व व्यक्तिमत्व हसतमुख, मिश्किल स्वभाव त्यामुळे त्यांनी सबंध गोव्यात अनेक माणसे जोडलेली आहेत. या ना त्या कारणाने नेहमीच प्रकाशझोतात असणा-या सुदैवी माणसापैकी ते एक. त्यामागे त्यांचे कष्ट, मेहनत तर आहेच परंतु सर्वसामान्यामध्ये मिसळण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करून दाखविण्याकडे त्यांचा कल. राजपत्रित अधिकारी असून देखील आपल्या हुध्यापेक्षा, मैत्री श्रेष्ठ मानणा-यापैक्षा ते आहेत. थोडक्यात सामाजिक जाणीव असलेल्या अवघ्याच सरकारी अधिका-यांमध्ये जॉन आगियार यांची गणना होते.
     जॉनची आई सारस्वत, तर वडिल कॅथलिक परंतु येशू ख्रिस्त आणि माता शांतादुर्गा या दोन्ही दैवतांची सेवा ते तेवढ्याच श्रध्देने करतात. त्यांच्या घरात सगळे हिंदू समाजातील सण साजरे होतात. ख्रिसमसही तेवढ्याच उत्साहाने साजरा होतो. लादीनच्या आयोजनामध्ये पुढाकार घेणारे जॉन, कॉलनीमधील सत्यनारायण महापूजाचेही यजमानपद तेवढ्याच हौसेने स्वीकारतात. आपण मानव धर्माला प्राधान्य देतो, देव देवतावरही आपला खूप विश्वास असल्याचे ते सांगतात. धर्म, धर्माच्या ठिकाणी मोठा असतो कारण प्रत्येक घर्म माणुसकी आणि कर्तव्याची शिकवण देतो हे त्यांचे तत्वज्ञान आपली पत्नी आणि सूनही हिंदूच आहे परंतु त्यामुळे आपल्या कुटुंबात कसल्याही प्रकारची तेढ कधीच निर्माण झाली नाही. उलट त्यामुळे घरच्या वातावरणातील आनंदाची व्याप्ती झाल्याची अनुभूती आपण घेत असल्याचे जॉन सांगतात.
     स्पष्ट, सरळ आणि मृदू बोलणारे जॉन हे कोकणी कवी आहेत. त्याचे चार कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्याशिवाय इंग्रजी आणि कोकणी रोमन लीपीतून निबंधाचे पुस्तकही प्रसिध्द झाले आहे. आकाशवाणीवरून त्यांच्या गीतरचना प्रसारित होतात. नामांकित गायकांनी त्यांची गीते गायिलेली आहेत. वर्तमानपत्रातून विविध विषयांवरील त्यांचे लिखाणही अधूनमधून प्रसिध्द होत असते. जॉन मुळात पत्रकार. एका इंग्रजी दैनिकामधून त्यांनी पत्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली. पुढे भविष्य आणि चरितार्थाचे वेगवेगळे आव्हानात्मक मार्ग त्यांनी चोखाळले. श्री. एदुआर्द फालेरो यांच्या विदेश व्यवहार विभागाच्या कार्यालयात निजी सचिव म्हणून त्यांनी सेवा दिली आहे. त्यावेळी गोवा राज्याच्या विकासा संदर्भातील अनेक योजना मार्गी लावण्यासाठी ते प्रयत्नशील होते. पत्रकारितेतील आपल्या ओळखी आणि अनुभव याचा फायदा त्याना विकासात्मक कामाच्या आखणीत झाला.
     गोव्याच्या हितसंबंधाशी जोडलेल्या बाबी सुरळीत आणि नीटनेटकेपणाने पार पडल्या जाव्यात. तत्कालीन मंत्री एदुआर्द फालेरो यांनीही जॉनकडे महत्वाची जबाबदारी सोपविली होती. सविताशी त्यांचा विवाह झाल्यानंतर गोवा आणि दिल्ली हा व्याप त्यांना जमेनासा झाला. परिणामी १९९१ साली त्यांनी माहिती साहाय्यक म्हणून नोकरी स्वीकारली. पुढे ते सरकारी नोकरीतच स्थिर राहिले. त्यांच्या पत्नी सौ, सविता आगियार याही सरकारी राजपत्रित अधिकारी आहेत.
     जॉन करारी वृत्तीचे आहेत. हातात घेतलेले काम, मग कितीही अडथळे येओत, ते पूर्ण करण्यासाठी त्यांची धडपड असते. कुठल्याही स्तरावर जाऊन ते काम करण्याची त्यांची तयारी असते. मडगावच्या चौगुले कॉलेजमधून त्यांनी कला विषयामधील पदवी संपादन केली. पार्वतीभाई चौगुले कॉलेजचा कुशल, अष्टपैलू विध्यार्थी म्हणून त्यांना गौरविण्यात आले होते. कॉलेजमध्ये असताना सगळ्या विध्यार्थ्याची फौज जॉनच्य़ा मागे पुढे असायची आणि विशेष म्हणचे आजही या विध्यार्थी मित्रांशी ते मनाने जोडलेले आहेत. विदेशामध्ये असलेले त्यांचे गुरूवंधूही अधुनमधून फोन करून जॉनची विचारपूस करतात. नेमका हाच गुण जॉनला सरकारी नोकरीमध्येही उपयुक्त ठरला.
     गुलाब या कोकणी मासिकाचा २०११ सालाचा प्रसिष्ठेचा उत्तम लेखक पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता, लेखन आणि वक्तृत्व हा त्यांचा आवडीचा विषय. लिखाण आणि बोलण्याची विशिष्ट शैली त्यांनी विकसित केल्याचे जाणवते. उत्कृष्ट छात्र म्हणून एन.सी.सी. मध्ये त्यांनी लौकिक मिळविला. नेमबाजी हा त्यांचा छंद. नेमबाजीमध्येही त्यांनी आपल्या गुणवत्तेची छाप पाडली. गोवा पोलीस खात्याच्या होमगार्ड ण्ड सिव्हिल डिफेन्स विभागात बरीच वर्षे जॉननी कंपनी कमांडर म्हणून स्वेच्छा काम केले. आपल्या अधिकारपदाच्या कार्यकाळात होमगार्ड विभागात काम करणा-या गृहरक्षकांचे त्यांनी प्रतिनिधित्व केले. त्यांच्या व्यथा वरिष्ठ अधिका-यांना कळवून त्यांच्यासाठी सेवासुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्यही केले.
     होमगार्डमधील उत्कृष्ठ सेवेसाठी मुख्यमंत्री सुवर्णपदक व राष्ट्रपती सन्मानपदक त्यांना प्राप्त आहे. आपले नेतृत्वगुण व क्षमता सिध्द करण्याच्या मिळालेल्या संधीचे त्यांनी यथोचित सार्थक केले. पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिका-यांकडून कौतुकाची थाप मिळविणारे जॉन आगियार हे प्रचंड ताकदीचे रसायन असल्याची वरिष्ठ पोलीस अधिका-यांची खात्री झाली. परिणामी पोलीस महानिरीक्षक मॅडम सुंदरी नंदा पोलीस खात्याचे संपर्क अधिकारी म्हणून त्यांची अधिकृत नियुक्ती केली. या काळात पत्रकार आणि पोलीस खाते यामधील समन्वय अवाधित ठेवण्यात व संबंध वाढविण्यात ते यशस्वी झाले. मुळात पत्रकार व माहिती अधिकारी म्हणून स्वतःकडे असलेला अनुभव उपयोग पडला.
     जॉनचा जनसंपर्क दाडगा आहे सामाजिक बांधिलकीची जाण त्यांना आहे. आपल्या ओळखीचा वापर कुणाच्या तरी भल्यासाठी होत असेल तर तो करण्याची तयारी असते, तत्पर असे ते अधिकारी आहेत. अन्यायाची चीड असलेल्या या अधिका-याला अर्थातच अपमान उपहासही नवीन नाहीत परंतु चांगुलपणावर त्यांचा विश्वास आहे. दुस-याला समजून घेतले पाहिजे, चूक सुधारण्याची संधी त्याला दिली पाहिजे आणि तरीही सुधारण्याची चिन्हे एखादा दाखवता नसेल तरच त्याला शिक्षा मिळाली पाहिजे, अशा सकारात्मक विचारांचा हा अधिकारी सहनशील म्हणून ओळखला जातो.
     माहिती आणि प्रसिध्दी अधिकारी हा सरकार आणि समाज यामधील दुवा असतो. शासनाकडून होणारा विकास आणि योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे शासनाकडून वेळोवळी येणा-या सूचना, संदेश आणि महत्वाच्या वार्ता गोमंतकीयांना ज्ञात करण्याच्या जबाबदारीबरोबरच सरकार आणि जनतेमधील नाते दृढ करण्याचे आपले कर्तव्य ते खूप निष्ठेने पार पाडतात.  त्यासाठी शासनाकडून त्यांची प्रशंसाही झालेली आहे. अलीकडेच संगीतकार मुकेश घाटवळ, सिध्दनाथ बुयांव यांच्या ध्वनी तबकड्यामध्ये (सीडी) त्यांनी रचलेल्या गीताचा समावेश आहे. गोव्यातील नामवंत गायकांनी त्यांची ही गीते गायिली आहेत. गिर्यारोहणाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन त्यांनी उत्तम गिर्यारोहक म्हणून आपली कुवत आणि क्षमता दाखविलेली आहे. चेन्नई येथील मावळणकर राष्ट्रीय नेमबाजी वस्तादपणाच्या स्पर्धेतही सहभागी होऊन जॉनननी आपल्या कौशल्याचा ठसा उमटविला आहे.
     सरकारी नोकरी हा जनतेचा सेवक असतो. जनतेचा विश्वास संपादन करायचा असेल तर एक पाऊल पुढे टाकण्याची जबाबदारी सरकारी नोकरीने अंगीकारली पाहिजे. जनतेच्या निरपेक्ष सेवेमध्ये मिळणारा आनंद सुखदायी असतो. जनता आणि सरकार यामधील नाते दृढ करण्याचे काम जेवढे सरकारी कर्मचारी करू शकतात तेवढे ते कुणीही करू शकणार नाही असे मानणारा जॉन आगियार हा सरकारचा एक आदर्श अधिकारी आहे. सरकारी कर्मचारी व लोकामध्ये सख्य हवे, असे आग्रही मत त्यांनी व्यक्त केले.
     ह्या जून महिन्यात ते सरकारी कामातून सेवानिवृत्त होत आहे. आज जून ४ रोजी त्याच्या ६० व्या वाढदिवशी माझ्या त्याना सुभेच्छा.

Wednesday, June 3, 2020