- दुर्गाकुमार श्रीकृष्ण नावती
जॉन आगियार हा बिनधास्त प्रकृतीचा माणूस साधारण ४४ वर्षे आम्ही एकमेकांच्य़ा संपर्कात आहोत. १९७७ साली ‘बालवीर आणि विरबाला’ च्या शिबिरात साकोरड्याला आमची भेट झाली. मी रघुनाथ फडके आमच्या गाण्यामुळे तर जॉन आगियार अभिनय, मिमिक्रीमुळे या शिबिरात ‘हिरो’ बनले. सगळे शिबिरार्थी आमच्याभोवती गराडा घालायचे. मनोरंजनाची तहान आमच्याकडून भागवून घ्यायचे. मात्र जॉनच्या प्रतिभेची साक्ष या शिबिरातच मला मिळाली. त्याच्या उत्कर्षाची बीजे या तीन दिवशीय शिबिरातच मला जाणवली. पुढे जॉन मडगांवच्या चौगुले महाविध्यालयात उच्च शिक्षणासाठी दाखल झाला.
त्याच्या कविता अधुनमधून ‘राष्ट्रमत’ च्या कोकणी समर्पित पानावर झळकायच्या. बहुतेक कविता या तारूण्याच्या उंबरठ्यावरील कवीला शोभण्यासारख्या असायच्या. तरीही त्या वयात त्या वाजनीय असायच्या, आनंददायी असायच्या. कधी भेट झालिच तर आमची चर्चा व्हायची ती कवितांवर, साहित्यावर, पत्रकारीतेवर. त्यावेळी मी गणाधीश खांडेपारकरांच्या साप्ताहिक ‘मैफल’ या मराठी मुखपत्रात काम करायचो. कथा, कविता, मायानगरी अशी अनेक सदरे मीच सांभाळायचो. कै. खांडेपारकरही माझ्यावर मुद्दामहून विशेष जबाबदा-या टाकायचे अर्थातच माझ्यावर त्यांचा विश्वास होता. त्यामुळे पत्रकारीता आणि तत्सम क्षेत्रात मी रूळायला हवे, हाच सकारात्मक विचार संपादक खांडेपारकरनी केला असावा.
जॉन बी. ए. झाला, त्याला पत्रकारितेतच पलं भविष्य घडवायचं होतं आणि त्यासाठी त्याची धडपड सुरूच होती. दै. हेराल्ड मधून त्याने पत्रकार म्हणून आपले कारकिर्द सुरू केली. पत्रकाराना मिळणारे आर्थिक उत्पन्न हा संशोधनाचा विषय असला तरी हिमालय्एवढे समाधान शारदेच्या या सेवेमुळे प्राप्त होते, हा स्वानुभव आहे.पत्रकार ही नोकरी किंवा चरिकार्थाचा मार्ग, ही गोष्ट मलाही मान्य नाही. परंतू समाजातील विसंगतीवर पत्रकार आपल्या लेखणीच्या माध्यमातून अंकुश ठेऊं शकतो. समाजासाठी दिशादर्शक कार्य करू शकतो हीच बाब जॉननेही हेरली होती. म्हणूनच पत्रकारितेच्या विविध दालनामधून त्याचे हिंडणे सुरू होते. त्याला चरितार्थापेक्षा समाजाच्या हीत अहिंताची काळजी अधिक होतो. म्हणूनच पत्रकारीतेच्या विविध दालनामधून त्याचे हिंडणे सुरू होते. त्याला चरितार्थापेक्षा समाजाच्या हीत अहिंताची काळजी अधिक होतो. म्हणूनच अत्यंत उमेदीने आणि उर्जेने त्याने आपल्यामधील पत्रकार चेतविला, त्याला जागृत ठेवले.
जॉन अष्टपैलू आहे. पत्रकार, गीतकार, कवी, साहित्यिक म्हणून आपल्या कुवतीनुरूप तो वावरलेला आहे. गोवा पोलीस खात्यामध्ये जनसंपर्क तसेच पत्रकार समन्वयक म्हणून जवळ जवळ सात वर्षे तो कार्यरत होता. आपल्या पत्रकार समन्वयक पदाच्या कारकिर्दीत गोव्यात घडणा-या गुन्हेगारी जगतातील वार्ताकन करून ते पत्रकारांपर्यंत पोहचविण्याचे कार्य त्याने चोखपणे बजावलेले आहे. त्यासाठी गोव्याचे माजी पोलीस प्रमुख डॉ. आदित्य आर्या, सुंदरी नंदा यानी त्याची प्रशंसा केली होती. सध्या भारत स्काऊट ॲण्ड गाईडस् असोसिएशनच्या जनसंपर्कपदाची धुरा त्याच्या खांद्यावर आहे. हाती घेतलेल्या प्रत्येक कामास आपल्या विशिष्ट शैलीने न्याय देण्यात जॉनला वाकबदार मानले जाते.
गोवा पोलीस खात्याशी निवडीत गृहरक्षक आणि नागरी सेवा अंतर्गत अनेक उपक्रमात ह्याचा प्रमुख सहभाग राहिलेला असून कंपनी कमांडर म्हणून आजही तेवड्याच उमेदिने आणि नेटाने जॉन स्वेच्छेने काम करतो आहे. फोंडा पत्रकार संघाने जॉनच्या प्रतिभेची दखल घेऊन अनेकवेळा त्याला सन्मानित केले आहे. सुरूवातीच्या काळात केंद्रीय राज्यमंत्री एदुआर्द फालेरो यांच्या कार्यालयात नीजी सचिव म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. बराच काळ नवी दिल्लीत त्याचे वास्तव्य होते. तिथेही गोमंतकीय जनतेची सेवा करण्यात जॉन धन्यता मानायचा. गोव्यातील लोकांना शिष्टाचार आणि आत्मियतेने वागविण्यात तो धन्यता मानायचा. केंद्रिय रसायन आणि खत मंत्र्यांच्या कार्यालयातही नीजी सचिव म्हणून जॉनने सेवा दिलेली आहे. तसेच नवी दिल्लीतील तत्कालिन अर्थ खात्याच्या राज्यमंत्र्यांचा सहाय्यक म्हणूनही जॉन वावरलेला आहे.
समाजामधील त्याच्या योगदानासाठी कैक बक्षीसे आणि प्रमाणपत्रे त्याच्या संग्रही आहेत. गृहरक्षक आणि नागरी सेवेसाठी राष्ट्रपतींचा सर्वोच्च पुरस्कार त्यांना नुकताच जाहिर झालेला असून २०१२ साली राष्ट्रपती स्वर्णपदक व सन्मान त्याला प्राप्त झालेला आहे. २०१५ साली राष्ट्रीय गृहमंत्रालयाचा गुणवत्ता पुरस्कारही जॉनने मिळविला आहे. एनसीसी चा उत्तम कॅडेट म्हणूनही प्रमाणपत्र देऊन एन. सी. सी. उपसंचालनालयातर्फे त्याचा गौरव करण्यात आला आहे. बेतोडा येथील पारवडेश्वर महाराजांचा विश्वशानपीसाठीचा धर्म भक्ती पुरस्कारही जॉनला मिळाला. २०११ साली त्याना हा अध्यात्मिक किताब मिळाला. पत्रकारीतेतील योगदानासाठी दक्षिण गोवा पत्रकार संघाने त्याना सन्मानित केले. केंद्रिय मानवाधिकार समिती दिल्ली यानीही महिला दिनाचे औचित्त्य साधून समाज गौरव पुरस्कार त्याला समर्पित केला. कॉलेज जीवनात श्रीमती हिरा वाघ स्मरणार्थ अष्टपैलू विध्यार्थी म्हणून जॉनचा सन्मान घडवून आणण्यात आला होता. २०१० साली उत्तम शब्दरचनेसाठी कलांगण संस्थेने मेंगलोर येथील कार्यक्रमात जॉनला बक्षीस प्रदान केले होते. २०११ साली गुलाब मासिकाने उत्तम लेखनासाठी त्याची निवड करून त्याला पुरस्कार दिला होता. कोकणी भाषा मंडळ, रॉटरी क्लब, पणजी, सांगे-केपे पत्रकार संघाचा पत्रकार मित्र पुरस्कार, गोवा निवडणुक आयोग, सावर्डे केपे पत्रकार संघ, अंत्रूज शिगमोत्सव, अखिल गोमन्तक नाभिक समाज अशा अनेक संस्थानी त्याच्या कार्याची दखल घेऊन त्याला सन्मान प्रदान केलेले आहे.
जॉन हा कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर असा गोवा शासनातील अधिकारी असून माहिती खात्यातून माहिती अधिकारी म्हणून या महिन्यात तो निवृत्त होतो आहे. ४ जून रोजी जॉन वयाची ६१ वर्षें पुर्ण करत आहे. त्याला उर्वरीत आयुष्यात उदंड आयुत्तरोग्य आणि समाधान प्राप्त होवो अशी परमेश्वराकडे प्रार्थना.
No comments:
Post a Comment